निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:21 IST2021-04-30T04:21:49+5:302021-04-30T04:21:49+5:30

मनोहर सैतवाल जळगाव : मनोज सैतवाल (८७, रा. मोहननगर) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते सतीश सैतवाल यांचे ते ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

मनोहर सैतवाल

जळगाव : मनोज सैतवाल (८७, रा. मोहननगर) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते सतीश सैतवाल यांचे ते वडील होत.

---

रमेश खंडारे

जळगाव : साळी समाजाचे समाजभूषण रमेश खंडारे (७४) यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, पुतणे, मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. श्री जिव्हेश्वर युवक मंडळाचे सहसचिव किशोर खंडारे यांचे ते वडील होत.

--

प्रकाश चौधरी

जळगाव : प्रकाश चौधरी (७८, रा. विष्णूनगर, गणेश कॉलनी) यांचे पुणे येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. प्रशांत चौधरी यांचे ते वडील होत.

---

जयश्री नेहेते

जळगाव : जयश्री नेहेते (४०) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगी, सासू, सासरे असा परिवार आहे. प्रल्हाद नेहेते यांच्या त्या सून होत.

--

हिमांशू बोरसे

जळगाव : हिमांशू बोरसे (३८) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई आणि बहीण असा परिवार आहे.

---

विक्रम पाटील

जळगाव : सामाजिक कार्यकर्ते विक्रम पाटील (९१, रा. निंभोरा, ता. धरणगाव) यांचे निधन झाले. उ.म.वि.मधील भिकन पाटील यांचे ते वडील होत.

--

अलका सोनार

जळगाव : अलका सोनार (ईखनकर) (५५, रा. भुसावळ) यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सून, नातू असा परिवार आहे. मंगेश सोनार यांच्या त्या आई होत.

--

Web Title: Death talk