निधन वार्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:17 IST2021-04-27T04:17:34+5:302021-04-27T04:17:34+5:30
जळगाव : पुष्पाबाई जाधव (५२,रा.ओमशांतीनगर, प्रिंपाळा) यांचे शुक्रवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यापश्चात दोन मुले, सून, नात असा ...

निधन वार्ता
जळगाव : पुष्पाबाई जाधव (५२,रा.ओमशांतीनगर, प्रिंपाळा) यांचे शुक्रवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यापश्चात दोन मुले, सून, नात असा परिवार आहे. त्या दिलीप जाधव यांच्या पत्नी होत.
--
बन्सीलाल देवराज
जळगाव : ग.स.सोसायटीचे सेवानिवृत्त शाखाधिकारी बन्सीलाल देवराज (७७) यांचे सोमवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यापश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. कैलास देवराज यांचे ते वडील होत.
---
डॉ.एकनाथ पाटील
जळगाव : ज.जि.म.वि.प्रसा.सह.समाज मर्या.संस्थेचे ज्येष्ठ संचालक डॉ.एकनाथ पाटील (मोरगाव) (८६) यांचे सोमवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. नूतन मराठा महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.संजय पाटील यांचे ते वडील होत.
--
एकनाथ पवार
जळगाव : प्रगतिशील शेतकरी एकनाथ पवार (८२, रा.भोकर) यांचे रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यापश्चात पत्नी, चार मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. राजेंद्र पवार यांचे ते वडील होत.
--
शशिकला खडके
जळगाव : शशिकला खडके (६१, रा.आयोध्यानगर) यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. दिलीप खडके यांच्या त्या पत्नी होत.
--
केशव पाटील
जळगाव : कानळदा येथील आदर्श माध्य. विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक केशव पाटील (८८) यांचे नाशिक येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यापश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सुनील पाटील यांचे ते वडील होत.
---
लिलाबाई पवार
जळगाव : लिलाबाई पवार (७०, रा.वावडदे) यांचे रविवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्यापश्चात मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. माजी सरपंच ईश्वर पवार यांच्या आई होत.
--