निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:17 IST2021-03-16T04:17:50+5:302021-03-16T04:17:50+5:30

जळगाव : महारू धोंडू बारी (८२,रा.तेली गल्ली,विठ्ठल पेठ) यांचे सोमवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यापश्चात मुलगा, सून, दोन मुली, ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

जळगाव : महारू धोंडू बारी (८२,रा.तेली गल्ली,विठ्ठल पेठ) यांचे सोमवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यापश्चात मुलगा, सून, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते गजानन बारी यांचे वडील होत.

कमलबाई पाटील

जळगाव : कमलबाई पाटील (रा.मेहेरगाव, ता.अमळनेर) यांचे सोमवारी संध्याकाळी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा मंगळवारी सकाळी १०वा. निघेल. बी.जे. मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या यांच्या त्या आई होत.

धनलाल भावसार

जळगाव : धनलाल भावसार (८७, रा.शंकरअप्पा नगर, पिंप्राळा) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्यापश्चात तीन मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. वीजनिर्मिती कंपनीतील सेवानिवृत्त कर्मचारी विनोद भावसार यांचे ते वडील होत.

जगन्नाथ पाटील

जळगाव : जगन्नाथ पाटील (८६, रा.खान्देश मिल कॉलनी) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यापश्चात तीन मुले, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. सहायक फौजदार गोपाल पाटील यांचे ते वडील होत.

मथुराबाई जाधव

जळगाव : मथुराबाई जाधव (१००, रा.विवेकानंदनगर) यांचे दि.९ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.

संतोष डोंगरे

जळगाव : संतोष डोंगरे (४८, रा.डॉ.आंबेडकरनगर, जुने जळगाव) यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यापश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. अशोक डोंगरे यांचे ते भाऊ होत.

भानुदास महाजन

जळगाव : भानुदास महाजन (७७, रा.शिवकॉलनी) यांचे सोमवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यापश्चात पत्नी, दोन मुले, नातवंडे असा परिवार आहे.

सुमनबाई बारी

जळगाव : सुमनबाई बारी (आडबाल) (७६, रा.विठ्ठलपेठ, बारीवाडा) यांचे रविवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यापश्चात पाच मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शांताराम बारी यांच्या आई होत.

Web Title: Death talk