जळगाव : सतखेडा, ता.धरणगाव येथील आश्रमशाळेत दुसरीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या अजय गुरुदास बारेला (वय ८, रा.सिंगन्या, ता.सेंधवा, मध्य प्रदेश, ह.मु.दोनगाव, ता.धरणगाव) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. या विद्यार्थ्याला सकाळी उलट्या झाल्या होत्या. दरम्यान, विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणावर शाळा व प्रशासनाकडून कोणीच बोलायला तयार नाही.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अजय बारेला या विद्यार्थ्याला बुधवारी सकाळी सात वाजता उलट्यांचा त्रास झाला. त्यामुळे शिक्षकांनी त्याला पिंप्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला शाळेत नेण्यात आले. त्यानंतर काही वेळाने पुन्हा त्याला त्रास जाणवू लागला. त्यामुळे कर्मचाºयांनी अजय याला पिंप्री येथील खासगी दवाखान्यात नेले. तेथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर जळगावला नेण्याचा सल्ला दिला. दुपारी दोन वाजता जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी अजयला मृत घोषित केले.
सतखेडा आश्रमशाळेत विद्यार्थ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 16:38 IST
सतखेडा, ता.धरणगाव येथील आश्रमशाळेत दुसरीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या अजय गुरुदास बारेला (वय ८, रा.सिंगन्या, ता.सेंधवा, मध्य प्रदेश, ह.मु.दोनगाव, ता.धरणगाव) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली.
सतखेडा आश्रमशाळेत विद्यार्थ्याचा मृत्यू
ठळक मुद्देशाळा व प्रशासनाकडून माहिती देण्यास टाळाटाळसुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवरसकाळी उलट्या झाल्यानंतर विद्यार्थ्याचा झाला मृत्यू