डोंगरगाव येथे दीड लाखासाठी विवाहितेची हत्या
By Admin | Updated: September 24, 2015 00:17 IST2015-09-24T00:17:31+5:302015-09-24T00:17:31+5:30
माहेरून दीड लाख रुपये न आणल्याने 35 वर्षीय विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन खून करून मृतदेह विहिरीत फेकून दिल्याची घटना डोंगरगाव, ता. शहादा येथे बुधवारी घडली

डोंगरगाव येथे दीड लाखासाठी विवाहितेची हत्या
शहादा : घर बांधण्यासाठी व रिक्षा घेण्यासाठी माहेरून दीड लाख रुपये न आणल्याने 35 वर्षीय विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन खून करून मृतदेह विहिरीत फेकून दिल्याची घटना डोंगरगाव, ता. शहादा येथे बुधवारी घडली. याप्रकरणी या विवाहितेच्या पतीसह पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनुसार, डोंगरगाव येथील संजय सखाराम शिरसाठ याचा नकाणे, ता. धुळे येथील मीनाक्षी हिच्याशी 15 वर्षापूर्वी विवाह झाला. मात्र लगA झाल्यापासून या महिलेने माहेरून दीड लाख रुपये आणावे यासाठी शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. त्यातूनच 23 सप्टेंबर रोजी सकाळी 7.30 वाजता मीनाक्षीला जिवे ठार मारले. यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह गावातीलच विहिरीत टाकला. ही घटना या विवाहितेच्या माहेरी समजल्यानंतर या विवाहितेची आई मथाबाई लक्ष्मण गायकवाड यांनी शहादा पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून मीनाक्षीचे पती संजय सखाराम शिरसाठ, सासरे सखाराम भिका शिरसाठ, सासू मायाबाई सखाराम शिरसाठ, दीर राजेंद्र सखाराम शिरसाठ, अनिल सखाराम शिरसाठ सर्व रा. डोंगरगाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.