विजेच्या धक्क्याने शाळकरी बालकाचा मृत्यू

By Admin | Updated: July 5, 2017 12:25 IST2017-07-05T12:25:17+5:302017-07-05T12:25:17+5:30

महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळेच मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

The death of the schoolgirl by electric shock | विजेच्या धक्क्याने शाळकरी बालकाचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने शाळकरी बालकाचा मृत्यू

 ऑनलाईन लोकमत

चोपडा,दि.5 - विजेच्या खांबाला ताण दिलेल्या तारेत विजप्रवाह उतरून शॉक लागल्याने, 7 वर्षीय शाळकरी बालकाचा 5 रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास तालुक्यातील माचला येथे मृत्यू झाला. महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळेच मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
माचला  येथील भिलवाडी भागात राहणारा कृष्णा दादाभाऊ भिल हा इयत्ता पहिलीत शिकणारा बालक, वस्तीच्या बाहेर निघाला होता. त्याच्या घराबाहेरच विजेचा खांब आहे. त्यास तारेचा ताण दिलेला आहे. ताण दिलेल्या तारेत विजप्रवाह उतरला. कृष्णाचा तारेला स्पर्श होताच तो चिटकला. शॉक लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.मुलाच्या मृत्यूस महावितरणच्या कर्मचा:यांचा हलगर्जीपणा कारणीभूत  असल्याचा आरोप भिलवाडीतील ग्रामस्थांनी केला. ही  घटना महावितरणच्या हलगर्जीपणामुळे झाली असल्याने या मृत्यूची ते जबाबदारी घेत नाही तोंपयर्ंत आम्ही मुलाचे शव विच्छेदनासाठी पाठवणार नाही असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने भिलवाडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

Web Title: The death of the schoolgirl by electric shock