जळगावात निवृत्त शिक्षिकेचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यू

By Admin | Updated: May 29, 2017 10:36 IST2017-05-29T10:36:43+5:302017-05-29T10:36:43+5:30

निवृत्त शिक्षिका तबस्सुम जहाँ मोहंमद हनिफ खान (66) यांचा रविवारी स्वाईन फ्ल्यू आजाराने औरंगाबाद येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Death of a retired teacher swine flu in Jalgaon | जळगावात निवृत्त शिक्षिकेचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यू

जळगावात निवृत्त शिक्षिकेचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यू

 ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.29- शहरातील मेहरुण भागातील अक्सानगरातील रहिवासी व निवृत्त शिक्षिका तबस्सुम जहाँ मोहंमद हनिफ खान (66) यांचा रविवारी स्वाईन फ्ल्यू आजाराने औरंगाबाद येथे उपचारादरम्यान  मृत्यू झाला. 
तबस्सुम खान यांना ताप आल्याने जळगावातीलच खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतरही त्यांचा आजार बरा होत नसल्याने त्यांना औरंगाबाद येथे खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्यांना स्वाईन फ्ल्यू असल्याचे निदान झाले. 15 दिवसांपासून त्यांच्यावर औरंगाबाद येथेच उपचार सुरू होते. 
अखेर रविवारी त्यांचा औरंगाबाद येथेच मृत्यू झाला. औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयाने दिलेल्या मृत्यूच्या दाखल्यात या महिलेचा स्वाईन फ्ल्यूने (एच -1, एन-1) मृत्यू झाल्याने नमूद केले आहे. 

Web Title: Death of a retired teacher swine flu in Jalgaon