रिक्षाखाली दबून पादचारी वृद्धेचा मृत्यू
By Admin | Updated: May 17, 2017 19:08 IST2017-05-17T19:08:58+5:302017-05-17T19:08:58+5:30
या अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे

रिक्षाखाली दबून पादचारी वृद्धेचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
फैजपूर, जि. जळगाव, दि. 17 - भरधाव वेगाने जाणारी रिक्षा अंगावर उलटून झालेल्या अपघात जिजाबाई रामा सपकाळे (वय 60, रा.वढोदा) ही पादचारी वृद्ध महिला ठार झाली. हा अपघात पिंपरुळ, ता.यावल फाटय़ाजवळ झाला. या अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिजाबाई सपकाळे या पिंपरुळ फाटय़ाजवळून वढोदा येथे घरी पायी जात असताना भुसावळकडून सावद्याकडे जाणारी प्रवासी रिक्षा क्र. (एम.एच.19 व्ही.1612) उलटून त्याखाली जिजाबाई दाबली गेल्याने त्यांच्या डोक्यास, पोटाला व हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.