जळगावात पासपोर्ट एजंटचा लॉजमध्ये मृत्यू
By Admin | Updated: May 25, 2017 16:50 IST2017-05-25T16:50:16+5:302017-05-25T16:50:16+5:30
रेल्वे स्टेशन परिसरातील गोकुळ गेस्ट हाऊस येथे गेल्या सहा महिन्यांपासून वास्तव्यास असलेल्या वृध्द पासपोर्ट एजंटचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली आह़े

जळगावात पासपोर्ट एजंटचा लॉजमध्ये मृत्यू
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.25- रेल्वे स्टेशन परिसरातील गोकुळ गेस्ट हाऊस येथे गेल्या सहा महिन्यांपासून वास्तव्यास असलेल्या वृध्द पासपोर्ट एजंटचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली आह़े हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जयनगरातील रजनीश रमेश लाहोटी यांचे रेल्वे स्टेशन परिसरात गोकुळ गेस्ट हाऊस आहे. या गेस्ट हाऊसमध्ये रूम नं. 4 मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून पासपोर्ट एजंट मनोहर विठ्ठलभाई पटेल (वय-65) हे वास्तव्यास होत़े 25 रोजी सकाळी 10 वाजता गेस्ट हाऊसमध्ये पटेल यांना भेटण्यासाठी ग्राहक आला़ त्यामुळे कर्मचा:यांनी दार ठोठावले. प्रतिसाद न मिळाल्याने याबाबत शहर पोलीस ठाण्यात माहिती दिली़ पोलिसांच्या समक्ष बनावट चावीने दार उघडल्यानंतर दरवाजानजीकच पटेल हे मयत स्थितीत मिळून आले.