शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू

By विजय.सैतवाल | Updated: May 12, 2024 23:44 IST

रात्री छातीत त्रास : गोळी घेऊन झोपले अन् सकाळी उठलेच नाही

जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी अमरावती येथून जळगावात आलेल्या संतोष बापूराव चऱ्हाटे (४८, रा. चिंचोली बु, रहिमापूर, ता. आंजनगाव, जि. अमरावती) या होमगार्डचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना रविवार, १२ मे रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात जळगाव जिल्ह्यात सोमवार, १३ मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी इतर जिल्ह्यातून पोलिसांसह होमगार्डचा बंदोबस्त मागविण्यात आला आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील होमागार्ड बंदोबस्तासाठी जळगावात आले आहेत. त्यांच्या राहण्याची व्यवस्था खान्देश सेंट्रल मॉल याठिकाणी करण्यात आली आहे. त्यानुसार याठिकाणी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विभागातील होमगार्ड संतोष चऱ्हाटे  यांची पी. एम. मुंदडे माध्यमिक विद्यालय, पिंप्राळा येथे परिसर बंदोबस्तासाठी नेमणूक करण्यात आली. तसेच रविवार, १२ रोजी सकाळी आठ वाजता त्यांना एकलव्य क्रीडा संकुल येथे मतदान साहित्य वाटपच्या ठिकाणी बोलवण्यात आले होते.

रात्रीच छातीत होता त्रासशनिवारी रात्री संतोष चऱ्हाटे व त्यांचे सहकारी अंकुश पडोळे यांनी सोबत जेवण केले. त्यानंतर ते झोपण्यासाठी गेले असता चऱ्हाटे यांनी पडोळे यांना छातीत किरकोळ दुखत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी गोळी घेतली आणि छातीला बाम लावून ते झोपून गेले.

सहकाऱ्याने उठवले, शरीर थंडगारसकाळी मतदान साहित्य वाटप ठिकाणी जायचे असल्याने पडोळे हे चऱ्हाटे यांना उठविण्यासाठी गेले. ते हालचाल करीत नसल्याने तसेच त्यांचे शरीर थंडगार जाणवल्याने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. तसेच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला.

बंदोबस्तासाठी आलेल्या होमगार्डचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, पोलिस उपअधीक्षक संदीप गावित, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जाऊन माहिती घेतली. चऱ्हाटे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचा मृतदेह अमरावती येथे रवाना करण्यात आला. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून प्राथमिक तपास पोहेकॉ विरेंद्र शिंदे करीत आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगावjalgaon-pcजळगावmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४