चाळीसगाव रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळ ओलांडताना नगरपालिका कर्मचा-याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 12:27 IST2017-11-17T12:25:07+5:302017-11-17T12:27:21+5:30
अकस्मात मृत्यूची नोंद

चाळीसगाव रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळ ओलांडताना नगरपालिका कर्मचा-याचा मृत्यू
ठळक मुद्देरेल्वे रुळ ओलांडताना धावत्या रेल्वेखालीसकाळी 10 वाजेची घटना
ऑनलाईन लोकमत
चाळीसगाव, जि. जळगाव, दि. 17 - चाळीसगाव रेल्वे स्थानकानजीक पंचशील नगराजवळ रेल्वे रुळ ओलांडताना धावत्या रेल्वेखाली आल्याने शिवाजी बाळासाहेब गांगुर्डे (वय 50) हे जागीच ठार झाले. ही घटना 17 रोजी सकाळी दहा वाजता घडली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत गांगुर्डे हे न.पा. कर्मचारी असल्याचे समजते.