हरताळे फाटय़ाजवळ वाहनाच्या धडकेत बिबटय़ाचा मृत्यू
By Admin | Updated: May 3, 2017 13:35 IST2017-05-03T13:35:32+5:302017-05-03T13:35:32+5:30
हरताळे फाटा : चार दिवसात दुसरा अपघात
हरताळे फाटय़ाजवळ वाहनाच्या धडकेत बिबटय़ाचा मृत्यू
मुक्ताईनगर,दि.3- भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बिबटय़ाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील हरताळे फाटय़ाजवळील इस्लामी ढाब्याजवळ मंगळवारी रात्री 10 वाजता झाली़
दरम्यान, चार दिवसांपूर्वीच याच जागेजवळ वाहनाच्या धडकेत हरणाचा मृत्यू झाला होता़
मंगळवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास हरताळे फाटय़ाजवळ अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने रस्त्याच्या मध्यभागीच बिबटय़ाचा मृत्यू झाला़ नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बिबटय़ाचा मृतेदह बाजूला केला़ अवघ्या दीड वर्ष वयाचा हा बिबटय़ा असल्याचे सांगण्यात आले. अपघातात त्याच्या तोंडाला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला़