विहिरीत पडून मालेगावच्या इसमाचा मृत्यू
By Admin | Updated: May 16, 2017 16:52 IST2017-05-16T16:52:36+5:302017-05-16T16:52:36+5:30
नितीन चौधरी हे कुंझर येथे त्यांचे शालक कैलास चौधरी यांच्याकडे आले होते.

विहिरीत पडून मालेगावच्या इसमाचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
मेहुणबारे, जि. जळगाव, दि. 16 - कुंझर येथे विहिरीत पडून मालेगाव येथील नितीन भिमराव चौधरी (वय 45) यांचा बुडून मृत्यू झाला. 16 रोजी ही घटना घडली. नितीन चौधरी हे कुंझर येथे त्यांचे शालक कैलास चौधरी यांच्याकडे आले होते. शौचास जात असताना ही घटना घडली. बराच वेळेपयर्ंत ते परत न आल्याने शोध घेतला असता ही घटना लक्षात आली. घटना नेमकी कशी घडली हे अद्याप स्पष्ट झाले नसून याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.