जळगाव शहरात बांधकामाच्या ठिकाणी इमारतीवरुन पडून मजुराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 20:24 IST2018-01-25T20:19:05+5:302018-01-25T20:24:36+5:30
बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या दुस-या मजल्यावर कॉलमची मार्कींग करताना तोल जावून पडल्याने संजय मंगा तायडे (वय ४५, रा.पिंप्राळा, जळगाव, मुळ रा.खिरोदा, ता.रावेर) या मजुराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ११ वाजता गांधी नगरात घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव शहरात बांधकामाच्या ठिकाणी इमारतीवरुन पडून मजुराचा मृत्यू
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,२५ : बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या दुस-या मजल्यावर कॉलमची मार्कींग करताना तोल जावून पडल्याने संजय मंगा तायडे (वय ४५, रा.पिंप्राळा, जळगाव, मुळ रा.खिरोदा, ता.रावेर) या मजुराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ११ वाजता गांधी नगरात घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तोल गेल्याने इमारतीवरुन कोसळला
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, गांधी नगरात दोन मजली इमारतीचे बांधकाम सुरु आहे. संजय तांबट या ठेकेदाराकडून हे बांधकाम सुरु आहे. संजय तायडे यांच्यासह दहा ते बारा मजूर गुरुवारी येथे कामाला होते. तायडे दुसºया मजल्यावर कॉलमची मार्कींग करीत असताना त्यांचा तोल गेला व ते थेट खाली कोसळले. डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ठेकेदाराने मात्र चक्कर आल्याने तायडे इमारतीवरुन पडल्याचा दावा केला आहे.