पाचोरा : तालुक्यातील भातखंडे खुर्द येथील नवेगाव वस्तीत राहणाऱ्या मंगलदास नामदेव कुमावत (४२) या बांधकाम मजुराचा पाय घसरून पडल्याने अपघाती मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी घडली.मंगलदास नामदेव कुमावत हा बांधकाम मजूर सकाळी कामावर जात होता. तेव्हा मुतारीत लघुशंकेसाठी गेला.तेथे पाय घसरून खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यास तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.या अपघाती मृत्यूमुळे भातखंडे खुर्द गावावर शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. शवविच्छेदन करून मृतदेह नातलगांच्या ताब्यात देण्यात आला. दुपारी भातखंडे खुर्द येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले ू
भातखंडे येथे पाय घसरून मजुराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:00 IST