अपघातातील जखमी शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 18:56 IST2019-06-18T18:56:12+5:302019-06-18T18:56:17+5:30
घरातील कर्ता पुरुष न राहिल्याने कुटुंबावर कोसळला दु :खाचा डोंगर

अपघातातील जखमी शेतकऱ्याचा मृत्यू
कजगाव, ता. भडगाव : चाºयासाठी केळीचे खांब वाहून नेणाºया अपघातात जखमी शेतकºयाचा उपचार घेताना मृत्यू झाला.
या घटनेबाबत माहिती अशी की, ११ रोजीच्या वादळात भास्कर धनराज पाटील यांची तीन हजार केळी जमीनदोस्त झाली होती. या संकटातून पाटील परीवार बाहेर पडत नाही तोच १५ रोजी चाºयासाठी केळीचे खांब वाहुन नेणाºया बैलगाडी व मोटरसायकल च्या अपघातात पाटील हे गंभीर जखमी झाले होते यांनंतर त्यांचा १७ रोजी पहाटे चार वाजता उपचारादरम्यान मृत्यु झाल्याने कुटुंबावर संकट कोसळले आहे. ते घरातील कर्ते पुरुष होते.
त्यांच्या पश्चात आई,पत्नी, एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे. सदर घटनेमुळे गावासह परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान केळीचे नुकसान झाले व कर्ता पुरुषही गेल्याने कुुटुंबाच्या स्वप्नांची राख रांगोळी झाली आहे.