पतीच्या निधनानंतर १२ तासात पत्नीचाही मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 18:44 IST2017-10-01T18:43:51+5:302017-10-01T18:44:11+5:30

पिलखोड, ता. चाळीसगाव : सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी नारायण भिका मगर (वय ८५) यांचे निधन झाल्यानंतर, १२ तासातच त्यांच्या पत्नी कावेरीबाई नारायण मगर (वय ७७) यांचेही निधन झाले.

Death of his wife in 12 hours after the death of her husband | पतीच्या निधनानंतर १२ तासात पत्नीचाही मृत्यू

पतीच्या निधनानंतर १२ तासात पत्नीचाही मृत्यू

आॅनलाईन लोकमत
पिलखोड, ता. चाळीसगाव : सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी नारायण भिका मगर (वय ८५) यांचे निधन झाल्यानंतर, १२ तासातच त्यांच्या पत्नी कावेरीबाई नारायण मगर (वय ७७) यांचेही निधन झाले. यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
उपखेड (जि.जळगाव) येथून ग्रामविकास अधिकारी म्हणून निवृत्त झालेले नारायण मगर यांचे २७ रोजी दुपारी दोन वाजता निधन झाले. अंत्यविधी दुसºया दिवशी २८ रोजी सकाळी आटोपला. यानंतर याच दिवशी दुपारी दीड वाजता त्यांच्या पत्नी कावेरीबाई यांचेही निधन झाले. अंत्यविधी सायंकाळी पार पडला.
त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, तीन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. ते टाकळी (प्र.दे.), ता. चाळीसगाव येथील शिवाजी विद्यालयाचे पर्यवेक्षक रवींद्र मगर व चंद्रशेखर मगर यांचे आई-वडील होत.

Web Title: Death of his wife in 12 hours after the death of her husband