जलतरण तलावात बुडून माजी महापौराच्या नातवाचा मृत्यू
By Admin | Updated: October 25, 2015 00:39 IST2015-10-25T00:39:46+5:302015-10-25T00:39:46+5:30
जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलावात बुडून जयेश शीतलकुमार नवले या 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. जयेश हा माजी महापौर मोहन नवले यांचा नातू आहे.

जलतरण तलावात बुडून माजी महापौराच्या नातवाचा मृत्यू
धुळे : जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलावात बुडून जयेश शीतलकुमार नवले या 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. बुडणा:या मित्राला वाचवण्याच्या प्रय}ात ही दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.} करताना जयेश मात्र स्वत:ला वाचवू शकला नाही. जयेश (रा.साने गुरुजी कॉलनी) हा माजी महापौर मोहन नवले यांचा नातू असून कनोसा कॉन्व्हेन्ट स्कूलचा विद्यार्थी होता. शनिवारी मोहरमनिमित्ताने शाळेला सुटी असल्याने जयेश सकाळी 6 वाजेला गणेश व दर्शन या दोन मित्रांसोबत देवपूर परिसरातील जिल्हा क्रीडा संकुलाच्या जलतरण तलावात पोहण्यासाठी गेलेला होता. यात बुडणा:या गणेशला वाचविण्याचे शर्थीचे यशस्वी प्रय सुरक्षेचे उपायच नव्हते! जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलावात सुरक्षेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना नसल्याची गंभीर बाब या घटनेमुळे समोर आली आहे. क्रीडा संकुलात लहान मुलांसाठी व प्रौढांसाठी वेगवेगळे दोन तलाव आहेत. मात्र, दोन्ही ठिकाणी नियमानुसार तलावातील खोलीच्या धोक्याची माहिती देणारे स्टिकर्स, सुरक्षारक्षक (लाइफगार्ड), सुरक्षेची साधने नसल्यानेच ही दुर्दैवी घटना घडल्याचे बोलले जात आहे.