पुत्राच्या निधनाच्या धक्क्याने पित्याचाही मृत्यू

By Admin | Updated: November 3, 2014 15:22 IST2014-11-03T15:22:26+5:302014-11-03T15:22:26+5:30

मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याचा आघात सहन न झाल्याने हृदयविकाराचा झटका येऊन पित्याचा मृत्यू झाल्याची दुर्घटना पिलखोड येथे घडली.

The death of the father by the death of the son is also death | पुत्राच्या निधनाच्या धक्क्याने पित्याचाही मृत्यू

पुत्राच्या निधनाच्या धक्क्याने पित्याचाही मृत्यू

पिलखोड ता. चाळीसगाव : मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याचा आघात सहन न झाल्याने हृदयविकाराचा झटका येऊन पित्याचा मृत्यू झाल्याची दुर्घटना पिलखोड येथे घडली. या पिता-पुत्राची एकाच वेळी अंत्ययात्रा काढण्याची दुर्दैवी वेळ गावकर्‍यांवर आली.
या हृदयाला चटका लावून जाणार्‍या घटनेबाबत माहिती अशी की, शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान गिरणा पुलावर गोवर्धन किसन बाविस्कर (वय २४) कार-मोटरसायकलच्या अपघातात ठार झाला. 
त्याचे वडील किसन उर्फ जिभाऊ दौलत बाविस्कर यांना या घटनेची वार्ता कळताच त्यांना हृदयविकाराचा झटका आला व त्याचे २ रोजीच पहाटे ४ वाजता निधन झाले. यामुळे बाविस्कर कुटुंबातच नव्हे तर गावातच शोककळा पसरली. २ रोजी पिता आणि पुत्राची एकाचवेळी अंत्ययात्रा काढण्यात आली. महानुभाव पद्धतीने अंत्यसंस्कार पार पडले. किसन यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, मुलगी, तीन भाऊ असा परिवार आहे. 
(वार्ताहर)

Web Title: The death of the father by the death of the son is also death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.