स्वस्त धान्य दुकान परवाना प्रकरणी आमरण उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 22:30 IST2020-09-03T22:30:00+5:302020-09-03T22:30:06+5:30
आमडदेकारांचे आंदोलन

स्वस्त धान्य दुकान परवाना प्रकरणी आमरण उपोषण
भडगाव : तालुक्यातील आमडदे येथील स्वस्त धान्य दुकान (रेशन दुकान) परवाना गैरप्रकारप्रकरणी १७ आॅगस्ट रोजी ग्रामस्थांनी लेखी तक्रार प्रशासनाकडे केली होती. या तक्रारीची कुठलीही दाखल घेतली नाही म्हणून भडगाव तहसील कार्यालय समोर आमडदे ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसले आहेत.
या बाबत अधिक वृत्त असे की, आमडदे गावातील स्वस्त धान्य दुकान बाबत जिल्हाधिकारी जळगाव, तहसीलदार भडगाव, यांच्याकडे वेळोवेळी लेखी तक्रार करून कुठलीही दाखल घेतली नाही म्हणून आमडदे येथील माजी सरपंच शेखर पाटील, तुकाराम पाटील, नाना पाटील, शालिनी पाटील, मीना पाटील हे ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसले आहेत.
जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवले जाईल, असा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे.