मशीनमध्ये अडकल्याने शेतमजुराचा मृत्यू
By Admin | Updated: February 27, 2017 16:48 IST2017-02-27T16:32:13+5:302017-02-27T16:48:29+5:30
शेतात हरभरा काढताना मशीनमध्ये अडकून शेतमजुराचा मृत्यू झाला.

मशीनमध्ये अडकल्याने शेतमजुराचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
भुसावळ, दि. 27 - शेतात हरभरा काढताना मशीनमध्ये अडकून शेतमजुराचा मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी तीन वाजता घडली. हरभरा काढत असताना या शेतमजुराचा हात मशीनमध्ये अडकला. त्यानंतर तो पूर्णपणे मशीनमध्ये खेचला गेला आणि मृत्यू झाला.
साकेगाव येथील काशीनाथ चिंधू पाटील यांच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील शेतात हरभरा काढण्याचे काम सुरू होते. शेतमजूर भाईदास दिलीप मालचे (२३) हा हरभरा काढत असताना अचानक तो मशीनमध्ये आल्याने त्याचा कापला जावून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर ग्रामस्थांची घटनास्थळी मोठी गर्दी झाली. मालचे हा कुटुंबातील एकमेव असल्याने आई-वडीलांनी मृतदेह पाहताच हंबरडा फोडला.