शेंदुर्णी येथे दर्शन रांगेतच वृद्धेचा मृत्यू
By Admin | Updated: July 5, 2017 13:27 IST2017-07-05T13:27:37+5:302017-07-05T13:27:37+5:30
त्रिविक्रम मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त दर्शनासाठी आलेल्या अंबिकाबाई भोंडे, (वय 75) यांचा दर्शन रांगेत उभ्या असताना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली.

शेंदुर्णी येथे दर्शन रांगेतच वृद्धेचा मृत्यू
ऑनलाईन लोकमत
शेंदुर्णी,ता.जामनेर,दि.5-येथील त्रिविक्रम मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त दर्शनासाठी आलेल्या अंबिकाबाई भोंडे, (वय 75) यांचा दर्शन रांगेत उभ्या असताना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली.
पहूर येथील ग्रामपंचायतच्या माजी सदस्या अंबिकाबाई यंदाही आपल्या दोन्ही सुनांसह दर्शनासाठी रांगेत उभ्या होत्या. त्यांना अचानक चक्कर येऊन त्या जमिनीवर कोसळल्या. भाविकांनी त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन तपासणी केली असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.