दोघा अनोळखींचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू

By Admin | Updated: June 27, 2017 12:46 IST2017-06-27T12:46:15+5:302017-06-27T12:46:15+5:30

अप व डाऊन रेल्वे लाईनवर रेल्वेखाली आल्याने दोघा अनोळखींचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली़

Death due to two unknown strollers | दोघा अनोळखींचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू

दोघा अनोळखींचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू

ऑनलाईन लोकमत 
भुसावळ,दि.27 - अप व डाऊन रेल्वे लाईनवर रेल्वेखाली आल्याने दोघा अनोळखींचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली़ लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आह़े
अप मेनलाईनवर कि़मी़नं़447/17 ते 19 दरम्यान अज्ञात 60 ते 65 वर्षीय इसमाचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाला़ 26 जून रोजी ही घटना घडली़ उंची 5़5 फूट, बांधा मध्यम, रंग गव्हाळ, केस काळे-पांढरे, नाक सरळ, डोळे मध्यम, चेहरा लांबट, अंगात पांढरा व धोतर, मनगटावर लाल रंगाचा दोरा असे वर्णन आह़े ओळख पटत असल्यास लोहमार्गचे नाईक गोपाळकृष्ण सोनवणे यांच्याशी संपर्क साधावा़ 
दुसरी घटना डाऊन मेन लाईनवर कि़मी़नं़447/25 जवळील गेट नं़156 अ समोर 30 वर्षीय इसमाचा रेल्वेखाली येऊन मृत्यू झाल्याची घटना 26 रोजी घडली़ उंची 5़5, वर्ण काळा-सावळा, केस काळे, पांढ:या रंगाची पँट, काळ्या रंगाचा टी शर्ट असे अनोळखी मयत इसमाचे वर्णन आह़े धावत्या रेल्वेतून पडल्याने वा रेल्वेखाली आल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तवला जात आह़े तपास हवालदार हिरालाल जाधव करीत आहेत़ 

 

Web Title: Death due to two unknown strollers