जामनेर : शहरात दोन दिवसात सुमारे १०० डुक्कर मृत्यूमुखी पडल्याने शहरवासीय भयभीत झाले आहेत. वाढलेल्या थंडीमुळे अथवा अज्ञात रोगाने डुकरांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.शहरात प्रथम बीएसएनएल कार्यालयाजवळील गलाठी नाला परिसरात डुकरे मृतावस्थेत आढळून आले. त्यानंतर हळूहळू इतरही भागात डुकरे मृतावस्थेत आढळून येऊ लागले. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या मृत डुकरांची विल्हेवाट लावत असून वेगवेगळ्या भागात मृत डुकरे आढळत असल्याने पालिका कर्ममाºयांचीही तारांबळ उडत आहे.घातपात की नैसर्गिक मृत्यूवाढत्या डुकरांमुळे शहरातील रस्ता अपघातात वाढ झाली असून, रस्त्यावरुन झुंडीने पळणारे डुक्कर वाचविताना दुचाकीस्वार पडून जखमी होण्याच्या घटनाही घडत आहे. मदनी नगरमधील शादी हॉलमध्ये डुक्कर शिरल्याची घटना घडली होती. डुक्कर मालकांची दादागिरी वाढली असून आरोग्य विभागातील कर्मचाºयांवर हात उगारण्यापर्यंत त्यांची मजल वाढल्याचे सांगितले जात आहे. अजूनही डुकरांची संख्या कमी झालेली नाही. या सोबतच लहान मुलांना चावा घेण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. या मुळे डुकरांवर कोणी विष प्रयोग करीत आहे की अन्य कोणत्या कारणांनी त्यांचा मृत्यू होत आहे, असा संशयही व्यक्त केला जात आहे. पालिकेने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी रिझवान शेख यांनी केली आहे. या पूर्वी नगरसेवक रिझवान शेख यांनी केलेल्या मागणीवरुन पालिकेने चार महिन्यांपूर्वी डुक्करमुक्त शहर करण्याची घोषणा केली होती. मात्र या घटनेमुळे ही घोषणा केवळ कागदावरच आहे, असा आरोप केला जात आहे. पालिकेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.शहरातील मृत डुकरांबाबत नगरपालिकेकडून कोणतीही माहिती मिळाली नाही. मृत डुकराच्या शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकेल.- डॉ. डी.एस.पाटील, पशुसंवर्धध अधिकारी, जामनेर.
जामनेर येथे दोन दिवसात १०० डुकरांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 21:53 IST
शहरवासीय भयभीत
जामनेर येथे दोन दिवसात १०० डुकरांचा मृत्यू
ठळक मुद्देदहशत डुक्करमुक्तीची घोषणा हवेतच