पहूर ता.जामनेर : पेठ मधील रहिवासी प्रल्हाद जनार्दन सोनवणे (६९) हे सहा दिवसांपासून बेपत्ता झाले होते. सोमवारी त्याचा मृतदेह अजिंठा घाटात आढळला आला. याप्रकरणी अजिंठा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.प्रल्हाद जनार्दन सोनवणे हे घरात काही न सांगता निघून गेले होते. दि १२ रोजी पहूर पोलिसात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. परिवारातील लोक त्यांचा शोध घेत होते. सोमवारी त्यांचा मुलगा व त्याचा मित्र शोध घेत असतांना अजिंठा घाटातील एका ढाब्याच्या मागील बाजूस प्रल्हाद सोनवणे याचा मृतदेह त्यांना आढळून आला आहे. काही तरी विषारी द्रव्य सेवन करून मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अजिंठा येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
पहूरच्या इसमाचा अजिंठा घाटात सापडला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 22:28 IST
पेठ मधील रहिवासी प्रल्हाद जनार्दन सोनवणे (६९) हे सहा दिवसांपासून बेपत्ता झाले होते. सोमवारी त्याचा मृतदेह अजिंठा घाटात आढळला आला.
पहूरच्या इसमाचा अजिंठा घाटात सापडला मृतदेह
ठळक मुद्देसहा दिवसांपासून होते प्रल्हाद सोनवणे बेपत्ताअजिंठा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंदमुलगा व त्याच्या मित्राला सापडला मृतदेह