दरोडेखोरांच्या हल्ल्यात महिला ठार

By Admin | Updated: March 2, 2017 20:49 IST2017-03-02T20:49:56+5:302017-03-02T20:49:56+5:30

हिरापूर रोडवरील आदर्शनगरात २ रोजी पहाटे अडीच वाजेच्या दरम्यान दगडू दौलत देवरे यांच्या घरात दोन अज्ञात चोरट्यांनी जबरी घरफोडी करताना प्रतिकार करणाऱ्या

Daughters kill women | दरोडेखोरांच्या हल्ल्यात महिला ठार

दरोडेखोरांच्या हल्ल्यात महिला ठार

ऑनलाइन लोकमत
चाळीसगाव, दि. 02 -  हिरापूर रोडवरील आदर्शनगरात २ रोजी पहाटे अडीच वाजेच्या दरम्यान दगडू दौलत देवरे यांच्या घरात दोन अज्ञात चोरट्यांनी जबरी घरफोडी करताना प्रतिकार करणाऱ्या वृध्द दाम्पत्यावर हल्ला केला. या घटनेत महिला जागीच ठार झाली असून तिचा पती गंभीर जखमी आहे. जखमीस धुळे सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. चोरटे ३५ हजारांचा ऐवज लंपास करून पसार झाले आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
हिरापूर रोडवरील आदर्शनगर या गजबजलेल्या वस्तीत राहत असलेले सायकल दुरुस्ती करणारे दगडू दौलत देवरे यांचे राहते घर असून या घरात दोन अज्ञात चोरट्याने घरफोडी करण्याच्या उद्देशाने दरवाजाचा कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. यावेळी दगडू देवरे यांची पत्नी जिजाबाई दगडू देवरे (वय ६०) या जागा झाल्या. हे लक्षात येताच चोरट्यांनी त्यांचे डोक्यात तसेच पलंगावर झोपलेले दगडू दौलत देवरे (वय ६५) यांचे डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केली. यात जिजाबाई देवरे या जागीच मृत्यूमुखी पडल्या मर दगडू देवरे हे गंभीर जखमी झाले. यावेळी चोरट्यांनी जिजाबाईचे अंगावरील मणी मंगळसूत्र व चांदीच्या वस्तू असा एकूण ३५ हजार रु.चा माल चोरुन नेला. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक जालींदर सुपेकर यांच्यासह सर्व वरिष्टठ अधिकाऱ्यांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी श्वान पथकाने तितूर नदीपर्यंतचा माग दाखवला. तपासासाठी विविध ठिकाणी पथके रवाना करण्यात आली आहेत.

घटना संशयास्पद...
जखमी दगडू देवरे यांचे सायकल दुरुस्तीचे दुकान असून त्यांना चार मुले व मुलगी असा परिवार आहे. त्यांची मुले स्वतंत्र राहतात. देवरे यांची आर्थिक स्थिती सामान्य होती. या परिसरात अनेक आर्थिक संपन्न असलेल्या व्यक्तींची घरे असताना सामान्य देवरे कुटुंबाच्या घरावरच चोरटे का धडकले असा प्रश्न चर्चेत असून ज्या क्रूरतेने हल्ला झाला आहे, ते पाहता घटनेमागे काही वेगळे कारण तर नसावे ना? अशी शंकाही व्यक्त होत आहे.

Web Title: Daughters kill women