शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दत्तात्रय कराळेच नाशिक ‘आयजी’, ‘एलसीबी’चा प्रभारी ठरेना !

By सुनील पाटील | Updated: June 3, 2024 16:38 IST

स्वतंत्र आदेश निर्गमित,जळगावात स्पर्धा कायम.

सुनील पाटील, जळगाव : नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांचीच नियुक्ती झाली आहे. राज्याच्या गृह विभागाने सोमवारी याबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित केले.  डॉ.बी.जी.शेखर पाटील सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी सीआयडीचे रंजन कुमार शर्मा यांची नियुक्ती झाली होती. दोनच दिवसात कराळेंबाबत स्वतंत्र आदेश झाले. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अजून ठरलेला नसला तरी याच आठवड्यात ही नियुक्ती होऊ शकते.

लोकसभा निवडणुकीपूर्वीच अर्थात फेब्रुवारी महिन्यात राज्याच्या गृहमंत्रालयाने वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यात डॉ.बी.जी.शेखर पाटील यांची पुणे येथे बदली झाली होती. त्यांच्या जागी ठाणे येथील सहआयुक्त दत्तात्रय कराळे यांची नियुक्ती झाली होती. मात्र, या आदेशाविरुध्द शेखर यांनी केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरणाकडे (कॅट) धाव घेतली होती. कॅटने शेखर यांचा अर्ज वैध ठरवून त्यांनाच कायम केले होते.आता ते ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्याजागी कराळेच पदभार घेतील असे सांगितले जात असतानाच रंजन कुमार शर्मा यांची तात्पुरती नियुक्ती शासनाने केली होती, त्यामुळे कराळे यांची नियुक्ती होते की नाही की अन्य दुसऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती होते किंवा शर्माच कायम राहतात याबाबत उत्सुकता होती.

 सोमवारी आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेसाठी (एलसीबी) एमआयडीसीचे निरीक्षक बबन आव्हाड, जामनेरचे निरीक्षक किरण शिंदे, सध्या धुळ्यात कार्यरत असलेले निरीक्षक जयपाल हिरे व आताच जळगावात बदलून आलेले प्रदीप ठाकर यांच्या नावाची चर्चा आहे.

टॅग्स :JalgaonजळगावPoliceपोलिस