फैजपूर येथे दशामाता मिरवणुकीने वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 00:57 IST2018-08-11T00:55:18+5:302018-08-11T00:57:47+5:30
शुक्रवारी दुपारी फैजपूर शहरातील श्रीराम मंदिरापासून दशामाता मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले होते.

फैजपूर येथे दशामाता मिरवणुकीने वेधले लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
फैजपूर ििज. जळगाव : फैजपूर येथे मीनावाडा निवासिनी दशामाता उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून शुक्रवारी दशमाता स्थापनेनिमित्त शहरातून मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
शनिवार ११ रोजी दशामातेची विधिवत स्थापना यावल रोडवरील जानकीनगरमध्ये पिंपरुड येथील ग्राम पंचायत सदस्य किरण कोल्हे यांच्याकडे करण्यात येणार आहे.
शुक्रवारी दुपारी फैजपूर शहरातील श्रीराम मंदिरापासून दशामाता मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी उंटावर स्वार दशामातेचा सजीव देखावा सुद्धा या मिरवणुकीत आकर्षण ठरला होता.
ही मिरवणूक श्रीराम मंदिर, खुशालभाऊ रोड, सुभाष चौक, बºहाणपूर - अंकलेश्वरमार्गे जाऊन यावल रोडवरील जानकी नगरात समाप्त झाली. दरम्यान, शनिवार ११ रोजी दशामाता मूर्तीचीे विधिवत स्थापना करण्यात येणार असून भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन किरण कोल्हे यांनी केले आहे.