वादळी पावसामुळे मध्यरात्रीपासून चोपडा शहर अंधारात

By Admin | Updated: June 6, 2017 13:30 IST2017-06-06T13:30:46+5:302017-06-06T13:30:46+5:30

तारांवर फांद्या पडल्या : दुरूस्तीचे काम सुरू

In the dark of the city of Chopda due to the stormy rain | वादळी पावसामुळे मध्यरात्रीपासून चोपडा शहर अंधारात

वादळी पावसामुळे मध्यरात्रीपासून चोपडा शहर अंधारात

 ऑनलाईन लोकमत

चोपडा,दि.6 : येथे  मध्यरात्री 12 वाजेनंतर झालेल्या वादळी पावसामुळे मुख्य वीज वाहिनीच्या तारांवर झाडांच्या फांद्या पडल्याने, संपूर्ण शहराचा वीज पुरवठा खंडीत झाला.  6 रोजी दुपारी 12 वाजेर्पयत वीज पुरवठा सुरळीत झालेला नव्हता. यामुळे नागरिकांना प्रचंड उकाड्याला सामोरे जावे लागत आहे. 
 मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास झालेल्या आलेल्या वादळी पावसामुळे चांदा गौरी नगरातील एक भले मोठे झाड विजेच्या 11 के.व्ही.च्या मुख्य वहिनीच्या तारांवर पडले.त्यामुळे  संपूर्ण शहराचा वीज पुरवठा खंडीत झाला. पहाटे तीन वाजेपयर्ंत नेमका कुठे फॉल्ट झालेला आहे, तो शोधीत महावितरणचे अभियंत्यांसह कर्मचारी फिरत होते. पहाटेपासून ते झाड तोडून तारा जोडण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे असे सहायक शाखा अभियंता चोपडा विभाग 1 यांनी कळविले आहे

Web Title: In the dark of the city of Chopda due to the stormy rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.