चोपडा येथे कुºहाडीचा धाक दाखवून दरोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 16:28 IST2019-05-05T16:27:13+5:302019-05-05T16:28:08+5:30

चोरटे पसार : ६१ हजाराचा ऐवज लंपास

Dangerous scare at Chopda | चोपडा येथे कुºहाडीचा धाक दाखवून दरोडा

चोपडा येथे कुºहाडीचा धाक दाखवून दरोडा


चोपडा : येथील गुरुकुल नगरातील रहिवासी बन्सी साबा बारेला याच्या घरात तिघा चोरट्यांनी कुºहाडीचा धाक दाखवून रोख रकमेसह ६१ हजाराचा ऐवज लुटून ते पसार झाले.
पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, गुरुकुल नगरात ३ रोजी रात्री ११ ते ४ रोजी पहाटे ३ वाजेच्या दरम्यान बन्सी साबा बारेला यांच्या घरात रात्री तिघा चोरट्यांनी दरवाजाचा कडी कोंडा तोडून घरात शिरले.
यावेळी बन्सी बारेला यांची मुलगी घरात होती तीस कुºहाडीचा धाक दाखवून खाटेखाली ठेवलेली पेटीचे कुलूप तोडून त्यातील तीन ग्रॅम वजनाचे मणी मंगळसूत्र , ५३ हजाराची रोख रक्कम व जुना मोबाईल असा एकूण ६१ हजाराचा ऐवज लुटून ते फरार झाले.
याबाबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात बन्सी साबा बारेला याच्या फियार्दीवरून अनोळखी तिघांविरुद्ध भादवी ३८० , ४५८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार हे करीत आहेत.
नागरीकांमध्ये
भीतीचे वातावरण
शहरातील नागरी वस्तीत सदर घटनेने भीतीचे वातावरण पसरलेले आहे. दरोड्यातील आरोपी शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी तसेच चोरट्यांवरर वचक रहावा यासाठी या भागात रात्रीची गस्त वाढविण्याची आवश्यकता आहे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Web Title: Dangerous scare at Chopda

टॅग्स :Robberyदरोडा