मंत्रालयावर आता दंडुका मोर्चा काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:21 IST2021-08-13T04:21:25+5:302021-08-13T04:21:25+5:30

मराठा आरक्षण जाहीर व्हावे, यासाठी आरक्षणाची मशाल घेऊन महाराष्ट्रभर जनसंपर्क यात्रेनिमित्ताने नानासाहेब जावळे पाटील हे पारोळा येथे गुरुवारी पारोळा ...

Danduka Morcha will now be held at the Ministry | मंत्रालयावर आता दंडुका मोर्चा काढणार

मंत्रालयावर आता दंडुका मोर्चा काढणार

मराठा आरक्षण जाहीर व्हावे, यासाठी आरक्षणाची मशाल घेऊन महाराष्ट्रभर जनसंपर्क यात्रेनिमित्ताने नानासाहेब जावळे पाटील हे पारोळा येथे गुरुवारी पारोळा येथे आले असता छावा संघटना व मराठा सेवा संघ यांच्याकडून जंगी स्वागत करण्यात आले.

यावेळी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून मराठा आरक्षणाबाबत जोरदार घोषणाबाजी केली.

पारोळा-अमळनेर चौफुलीजवळ छावा संघटनेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी नानासाहेब जावळे पाटील यांनी याबाबतची रणनीती आखण्यासाठी महाराष्ट्रभर कार्यकर्त्याशी चर्चा करण्यासाठी व मराठा आरक्षण मिळविण्यासाठी जनसंपर्क अभियान हे सुरू आहे, असे सांगितले.

यावेळी केंद्रीय सहकार्याध्यक्ष भीमराव मराठे, युवक प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष दौलतराव पाटील, प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे, जिल्हाध्यक्ष संतोष पाटील, तालुकाध्यक्ष विजय पाटील, माजी कृउबा संचालक मनोराज पाटील, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सचिन पाटील, नगरसेवक पी. जी. पाटील, जेष्ठ सल्लागार प्रताप पाटील, शेतकरी आघाडी तालुकाध्यक्ष अविनाश मराठे, किशोर पाटील, तालुका कार्याध्यक्ष नितीन पाटील, शहराध्यक्ष संदीप पाटील, तालुका उपाध्यक्ष विनोद पाटील, राजीव पाटील, राजेंद्र महाजन, दिनेश पाटील, प्रदीप पाटील, संदीप पाटील, अरुण पाटील, जाकिर खाटीक, अमोल बाविस्कर, जगदीश माळी उपस्थित होते.

120821\12jal_10_12082021_12.jpg

पारोळा येथे छावा संघटनेच्या शाखा फलकाचे उद्घाटन करताना नानासाहेब जावळे पाटील, भीमराव जावळे, दौलत पाटील, विजय पाटील व संघटनेचे पदाधिकारी

Web Title: Danduka Morcha will now be held at the Ministry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.