तेरापंथ महिला मंडळातर्फे नृत्य व श्रावणगीत स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:20 IST2021-08-23T04:20:29+5:302021-08-23T04:20:29+5:30
जळगाव : श्रावण मासानिमित्त तेरापंथ महिला मंडळातर्फे नृत्य स्पर्धा तसेच श्रावण गीत स्पर्धा झाली. या वेळी बहारदार श्रावण गीतांनी ...

तेरापंथ महिला मंडळातर्फे नृत्य व श्रावणगीत स्पर्धा
जळगाव : श्रावण मासानिमित्त तेरापंथ महिला मंडळातर्फे नृत्य स्पर्धा तसेच श्रावण गीत स्पर्धा झाली. या वेळी बहारदार श्रावण गीतांनी रंगत आणली.
नवकार महामंत्राने कार्यक्रमाची सुरुवात झाली तर माही चोरडिया व गीत चोरडिया यांनी गणेश वंदना सादर करून नृत्य स्पर्धेची सुरुवात केली. अध्यक्षा नम्रता सेठिया, निर्मला छाजेड यांनी स्वागत केले. नेहा लुणिया, कोमल छाजेड, ऋचा सेठिया, वर्षा चोरडिया, ममता सुराणा, प्रिया बाफना यांनी एकल नृत्य सादर केले. निर्मला छाजेड, मोनिका छाजेड, प्रियंका छाजेड, पिंकी छाजेड, श्वेता छाजेड, दिशा छाजेड, निलू चोरडिया, रोनक चोरडिया, मोनिका चोरडिया, ज्योती चोरडिया यांनी समूह नृत्य सादर केले. सुनीता चोरडिया, रोनक चोरडिया, जयश्री लोढा, नीलू चोरडिया, प्रियंका छाजेड, रितू छाजेड, सोनम छाजेड यांनी गीत सादर केले. सपना सिंह, सुजाता बेद यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. उपाध्यक्षा स्नेहलता सेठिया यांनी सरप्राईज प्रश्नोत्तरे घेतली. वर्षा चोरडिया, नेहा लुणिया, कोमल छाजेड, श्वेता छाजेड, दिशा छाजेड यांनी विविध स्पर्धांमध्ये यश मिळविले. सूत्रसंचालन रिटा बेद व शीतल बुच्चा यांनी केले तर शीतल छाजेड यांनी आभार मानले.