डांभुर्णीच्या अर्चना नेवे यांचा रानभाजी महोत्सवात सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:21 IST2021-08-20T04:21:53+5:302021-08-20T04:21:53+5:30
किनगाव, ता. यावल : महाराष्ट्र शासन कृषी विभाग, प्रकल्प संचालक आत्मा व रोटरी क्लब यांच्यातर्फे जळगाव येथे आयोजित ...

डांभुर्णीच्या अर्चना नेवे यांचा रानभाजी महोत्सवात सन्मान
किनगाव, ता. यावल : महाराष्ट्र शासन कृषी विभाग, प्रकल्प संचालक आत्मा व रोटरी क्लब यांच्यातर्फे जळगाव येथे आयोजित रानभाजी महोत्सवात डांभुर्णी येथील अर्चना नेवे यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी यावल तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यात शेतकरी प्रदीप बारेला, योगेश बारेला, प्रमोद साळुंके, अनिल साळुंके, आरमान तडवी, वसीम तडवी, किरण बोंडे, गोवर्धन बऱ्हाटे आदींचा समावेश आहे. त्यात डांभुर्णी येथील समृध्दी सेंद्रिय शेती गटाचे अध्यक्ष मनोज नेवे व त्यांच्या पत्नी अर्चना नेवे यांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, आत्मा प्रकल्प उपसंचालक मधुकर चौधरी, आत्मा प्रकल्प उपसंचालक कुर्बान तडवी, केव्हीके शास्रज्ञ महेश महाजन यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी यावल तालुका कृषी अधिकारी आर. एन. जाधव, मंडळ कृषी अधिकारी सागर सिनारे, अजय खैरनार, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा यावलचे रवींद्र जाधव उपस्थित होते.