कजगाव परिसरात झालेल्या महापुराच्या पाण्यामुळे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:16 IST2021-09-03T04:16:30+5:302021-09-03T04:16:30+5:30

या निवेदनात नमूद केले आहे की, तितूर आणि डोंगरी नदीच्या उगमस्थानी झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे आलेल्या महापुरामुळे कजगावसह परिसरात घरांचे, ...

Damage due to floods in Kajgaon area | कजगाव परिसरात झालेल्या महापुराच्या पाण्यामुळे नुकसान

कजगाव परिसरात झालेल्या महापुराच्या पाण्यामुळे नुकसान

या निवेदनात नमूद केले आहे की, तितूर आणि डोंगरी नदीच्या उगमस्थानी झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे आलेल्या महापुरामुळे कजगावसह परिसरात घरांचे, शेती पिकांचे व जनावरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बऱ्याचजणांचे संसार उघड्यावर आले आहेत. शासनाने त्यांचे त्वरित पंचनामे करून संबंधितांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी. नुकसान झालेल्या गावांमध्ये भडगाव तालुक्यातील उमरखेड, तांदुळवाडी, भोरटेक, कजगाव, पासर्डी, पाचोरा तालुक्यातील पिंप्री, घुसर्डी, नगरदेवळा स्टेशन, होळ आदी गावांमधील नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत व नुकसान भरपाई मिळावी, असेही निवेदनात नमूद केले आहे.

या निवेदनावर राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ, तालुकाध्यक्ष राहुल पाटील, योजना पाटील, रेखा पाटील, हर्षल पाटील, स्वप्निल पाटील, गोंडगावचे राजेंद्र पाटील, स्वदेश पाटील, भूषण पाटील, अशोक पाटील, संजय पाटील, रवींद्र महाजन, मळगावचे संदीप चव्हाण, शेरु पठाण, संदीप मनोरे, अजय पाटील, कुणाल पाटील, मोहसीन खान, सिराल शेख आदींच्या सह्या आहेत.

020921\02jal_1_02092021_12.jpg

भडगाव तहसिलदार मुकेश हिवाळे यांना निवेदन देताना माजी आमदार दिलीप वाघ, तालुकाध्यक्ष राहुल पाटील.

Web Title: Damage due to floods in Kajgaon area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.