सततच्या पावसामुळे कपाशी, मका पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:21 IST2021-09-15T04:21:47+5:302021-09-15T04:21:47+5:30
दिवसांपासून सतत होणाऱ्या पावसामुळे कपाशी व मका या खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. या पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव दिसून ...

सततच्या पावसामुळे कपाशी, मका पिकांचे नुकसान
दिवसांपासून सतत होणाऱ्या
पावसामुळे कपाशी व मका या खरीप
पिकांना मोठा फटका बसला आहे. या
पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव दिसून
येतो. निसणीच्या वेळी मका पिकाला
पाणी न मिळाल्यामुळे उतारा कमी
बसणार आहे, तर कपाशीचे फुलपाते
गळले आहेत. कपाशीच्या कैऱ्यांवर
काळे डाग पडले आहेत. अती
पावसामुळे कपाशी मूगसह खरीप पिके
धोक्यात आली आहेत. कपाशी हे
नगदी पीक असल्यामुळे शेतकऱ्यांना
कपाशीबाबत आशा होती, ती आशा
धुळीस मिळाले आहे. एकंदरीत
पावसाळ्याच्या सुरुवातीला पावसाने
दिलेली ओढ पावसाचा
अनियमितपणा आणि आता सतत
होणारा पाऊस या नैसर्गिक आपत्तींमुळे
खरीप पिकांवर पाणी फिरले आहे.
अंजनीच्या जलसाठ्यांची
शतकी वाटचाल
तालुक्याची लाईफलाईन असलेले
अंजनी धरण ७२.१९ टक्के भरले आहे.
एकूण जलसाठा १५.०५ द.ल.घ.मी.
इतका आहे. एखादा पाऊस पडला तरी
अंजनी धरणात १०० टक्के पाणीसाठा
होऊ शकतो. खडकेसीम तलाव ८०
टक्के भरला आहे. मात्र भालगाव
तलाव जेमतेम ४० टक्के भरला आहे.