धरणगावात हातावर पोट भरणाऱ्या शिंप्याने ५०० मास्क शिवून केले वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 06:38 PM2020-04-04T18:38:09+5:302020-04-04T18:39:13+5:30

टेलर कामाच्या हातमजुरीवर जीवन जगणाºया डिसेंट टेलर परिवाराने स्वखर्चाने ५०० मास्क तयार करून समाजातील विविध घटकांना वाटप केले.

In the dam, a sprinkler with a handkerchief has sewed 4 masks | धरणगावात हातावर पोट भरणाऱ्या शिंप्याने ५०० मास्क शिवून केले वाटप

धरणगावात हातावर पोट भरणाऱ्या शिंप्याने ५०० मास्क शिवून केले वाटप

Next
ठळक मुद्देअत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना केले मोफत वाटपमित्र परिवाराने लावला हातभार

धरणगाव, जि.जळगाव : कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने धडपड करीत आहे. येथील टेलर कामाच्या हातमजुरीवर जीवन जगणाºया डिसेंट टेलर परिवाराने स्वखर्चाने ५०० मास्क तयार करून समाजातील विविध घटकांना वाटप केले.
कोरोनाच्या लढ्यात जनतेची काळजी घेणारे अत्यावश्यक सेवा पोलीस व महसूल कर्मचारी तसेच भाजीपाला विक्रेते, दुधवाले तसेच गोरगरीबांना मास्कची गरज असल्याचे डिसेंट टेलरचे मालक प्रल्हाद सोनवणी यांनी हेरले. सध्या लॉकडाऊनमध्ये घरी त्यांनी व त्यांचा मुलगा विनोद व परिवारातील सदस्यांनी घरीच कापडी मास्क शिवून मोफत वाटप करण्याचे ठरवले. त्यांना शिक्षक गोपाल चौधरी व कृषी विभागातील भारत कासार यांचे सहकार्य लाभले.
तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्या परवानगीने तहसील कार्यालयातूनच मास्क वाटप सुरू केले. तसेच सपोनि गणेश अहिरे यांच्या उपस्थितीत पोलीस कर्मचाºयांना मास्क वाटप करण्यात आले.
 

Web Title: In the dam, a sprinkler with a handkerchief has sewed 4 masks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.