शिरागडच्या सप्तशृंगी मंदिरावर दरोडा

By Admin | Updated: May 20, 2014 01:06 IST2014-05-20T01:06:50+5:302014-05-20T01:06:50+5:30

यावल : शिरागड निवासिनी सप्तशृंगीदेवीच्या मंदिरावर चड्डी - बनियन टोळीने सशस्त्र दरोडा टाकला

Dacoity at Saptashringi Temple in Shiragad | शिरागडच्या सप्तशृंगी मंदिरावर दरोडा

शिरागडच्या सप्तशृंगी मंदिरावर दरोडा

 यावल : शिरागड निवासिनी सप्तशृंगीदेवीच्या मंदिरावर चड्डी - बनियन टोळीने सशस्त्र दरोडा टाकला. यात पुजारी व विश्वस्तास मारहाण केली आणि मंदिरातील सहा दानपेट्या फोडून रोकड लांबवली़ रविवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास हा दरोडा पडला. जखमींवर जळगावमध्ये उपचार सुरू आहेत. आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. रविवारी रात्री चड्डी-बनियान पेहराव व तोंडावर रुमाल बांधलेल्या २५ ते ३० वयोगटातील पाच ते सहा जणांनी परिसरात प्रवेश केला. मंदिराबाहेर झोपलेले मंदिराचे विश्वस्त रवींद्र एकनाथ पाटील (३८) व पूजारी महादू मन्साराम कोळी (६५) यांना लाकडी दांड्याने जबर मारहाण केली़ दरोडेखोरांनी पुजार्‍याकडून किल्ली हिसकावत मंदिरातील दानपेट्या फोडल्या़ दानपेट्यातील सुमारे २८० किलो नाणी मंदिरात अस्ताव्यस्त पडलेली आढळून ंआली. पोलीस व पंचांनी रकमेची मोजणी केली असता दोन लाख २५ हजार रुपयांचे नाणे व २१ हजार रुपयांच्या नोटा आढळल्या़ मंदिराशेजारीच राहणार्‍या पुजारी कुटुंबीयांतील महिलांना दरोडेखोरांनी कुठलीही इजा केली नाही़ महादू कोळी यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला. करण्यात आला आहे़ घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी भेटी दिल्या आहेत.

Web Title: Dacoity at Saptashringi Temple in Shiragad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.