कासोद्यात जुगार अड्ड्यावर धाड, १५ जणांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 00:07 IST2019-10-01T00:07:16+5:302019-10-01T00:07:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कासोदा, ता. एरंडोल : येथे जळगावच्या स्थानिक गुन्हा शाखेतर्फे सोमवारी अचानक जुगार अड्ड्यावर धाड टाकण्यात आली. ...

Dacoits raid at gambling base | कासोद्यात जुगार अड्ड्यावर धाड, १५ जणांवर गुन्हे

कासोद्यात जुगार अड्ड्यावर धाड, १५ जणांवर गुन्हे



लोकमत न्यूज नेटवर्क
कासोदा, ता. एरंडोल : येथे जळगावच्या स्थानिक गुन्हा शाखेतर्फे सोमवारी अचानक जुगार अड्ड्यावर धाड टाकण्यात आली. त्यात १५ जणांना अटक करून गुन्हा दाखल झाला असून सर्वांची जामिनावर सुटका केली आहे.
सोमवारी एलसीबीच्या पथकाने येथे पत्त्यांच्या जुगार अड्ड्यावर अचानक धाड टाकली. यात सुमारे ७ हजार ६१० रोकड रकमेचा पंचनामा पोलिसांनी केला आहे.
कासोद्यातून याबाबत कुणीतरी वारंवार तक्रार केली होती. त्यामुळे ही धाड टाकली गेली, अशी चर्चा परिसरातील नागरिकांकडून ऐकावयास मिळत आहे. या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे.

Web Title: Dacoits raid at gambling base