सायकलपटूंनी केली दीपस्तंभ मनोबलला मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:14 IST2021-06-25T04:14:04+5:302021-06-25T04:14:04+5:30
जळगाव : जळगाव सायकलिस्ट ग्रुपने वरिष्ठ सायकलपटू आणि जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांच्या आईंच्या २१ व्या स्मृती ...

सायकलपटूंनी केली दीपस्तंभ मनोबलला मदत
जळगाव : जळगाव सायकलिस्ट ग्रुपने वरिष्ठ सायकलपटू आणि जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांच्या आईंच्या २१ व्या स्मृती दिनानिमित्त दीपस्तंभ मनोबलच्या नवीन प्रकल्पाला भेट दिली. तसेच प्रतापराव पाटील यांनी २१ हजार रुपयांची देणगीदेखील या प्रकल्पाला दिली. त्या निमित्ताने २१ सायकलपटूंनी ही भेट दिली.
यावेळी जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे, पाटबंधारे विभागाचे उप अभियंता विनोद पाटील, महेश सोनी, रुपेश महाजन, सुनील चौधरी, संभाजी पाटील, आशिष पाटील, निशांक फिरके, इरफान पिंजारी, डॉ.अनघा चोपडे, अतुल सोनवणे, उज्ज्वल पडोळे, मयूर जैन, पूनम रणदिवे, प्रा. अजय पाटील, प्रा.दीपक दलाल, राम घोरपडे, मोतीलाल पाटील, सखाराम ठाकरे, अनुप तेजवानी, डॉ. रवी महाजन, डॉ. रूपेश पाटील , परेश शहा, तेजस कावडिया, लक्ष्मण सपकाळे उपस्थित होते.