कंटेनरखाली चिरडून सायकलस्वार पेंटर ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2017 00:18 IST2017-02-28T00:18:44+5:302017-02-28T00:18:44+5:30

महामार्गावर अपघात : काम आटोपून घरी जात असताना घडली घटना

Cyclist Painter killed by crushing under the container | कंटेनरखाली चिरडून सायकलस्वार पेंटर ठार

कंटेनरखाली चिरडून सायकलस्वार पेंटर ठार

जळगाव : दुकानातील काम आटोपून सायकलने घरी जात असलेल्या पेंटरला मागून आलेल्या कंटेनरने चिरडल्याने  त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी संध्याकाळी सव्वा सात वाजता राष्टÑीय महामार्गावर अजिंठा चौकानजीक हॉटेल प्रिन्ससमोर घडली. सादीक बशीर खान (वय ४० रा.सुप्रीम कॉलनी पोलीस लाईन, मुळ रा.मुंबई) असे मयताचे नाव आहे.
सादीक खान हे आॅटो नगरमध्ये कासम पेंटर यांच्याकडे कामाला होते. सुप्रीम कॉलनीतून ते दररोज सायकलनेच ये-जा करतात. सोमवारी संध्याकाळी सात वाजता काम आटोपून घरी जात असताना हॉटेल प्रिन्ससमोर भुसावळकडून येणाºया कंटेनरने (क्र.एम.एच.०६ ए.क्यू.२६४७) मागून धडक दिली. त्यात ते सायकलसह मागील टायरखाली आल्याने चिरडले गेले. पोटावरुन टायर गेल्याने शरीर छिन्नविछिन्न झाले होते.
मदतीसाठी नाही थांबले वाहने
अपघात झाल्याचे समजताच परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेवून याबाबतची माहिती पोलीस स्टेशनला कळविली.
 

Web Title: Cyclist Painter killed by crushing under the container