गिरणा धरणातून उद्या आवर्तन सुटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:14 IST2021-05-30T04:14:17+5:302021-05-30T04:14:17+5:30
अनेक गावांत पाणी टंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे त्यावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांच्या विहिरींनी तळ गाठायला सुरुवात ...

गिरणा धरणातून उद्या आवर्तन सुटणार
अनेक गावांत पाणी टंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे त्यावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांच्या विहिरींनी तळ गाठायला सुरुवात केली होती. आवर्तन सोडण्यात येणार असल्याने अनेक गावांची पाणीटंचाई दूर होणार आहे. या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी गिरणा धरणातून आवर्तन सोडण्याचे आदेश दिले होते. जळगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता धर्मेंद्रकुमार बेहरे यांनी गिरणा पाटबंधारे विभागाला पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. गिरणा नदीकाठावरील गावांनी सतर्क राहावे व कृषी पंपाचा वापर करू नये, असे आवाहन गिरणा पाटबंधारे विभागाचे अभियंता हेमंत पाटील व शाखा अभियंता एस.आर. पाटील यांनी केले आहे. गिरणा धरणात सद्य:स्थितीत सात हजार दशलक्ष घनफूट म्हणजेच ३८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे तर तीन हजार दशलक्ष घनफूट मृत जलसाठा आहे.