एरंडोल येथे काँग्रेसतर्फे सायकल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:13 IST2021-07-18T04:13:17+5:302021-07-18T04:13:17+5:30
एरंडोल : येथे तालुका काँग्रेसतर्फे केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या व महागाईच्या निषेधार्थ सायकल रॅली शनिवारी काढण्यात आली. ...

एरंडोल येथे काँग्रेसतर्फे सायकल रॅली
एरंडोल : येथे तालुका काँग्रेसतर्फे केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या व महागाईच्या निषेधार्थ सायकल रॅली शनिवारी काढण्यात आली.
तालुकाध्यक्ष विजय महाजन यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. मरीमाता मंदिरापासून सायकल रॅलीची सुरुवात होऊन बुधवार दरवाजा मेन रोड माळीवाडा महात्मा फुले पुतळा, डॉ. आंबेडकर पुतळा या परिसरातून जाऊन तहसील कार्यालयाजवळ पोहोचली. त्याठिकाणी नायब तहसीलदार अहिरे यांना निवेदन देण्यात आले.
या रॅलीत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय महाजन, संजय भदाणे, इम्रान सय्यद, डॉ. राजेंद्र चौधरी, एजाज अहमद शेख, जब्बार शेख, सांडू आनंद संदानशिव, कल्पना लोहार, वैशाली मराठे, प्रा. आर. एस. पाटील, डी. वाय. पाटील आदी कार्यकर्ते सहभागी झाले.
अन्यायकारक महागाई व इंधन दरवाढीविरोधात घोषणा देत दरवाढीचा निषेध करण्यात आला.