इंधन दरवाढ निषेधार्थ अमळनेरला काँग्रेसतर्फे सायकल मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 13:16 IST2021-07-12T13:16:01+5:302021-07-12T13:16:42+5:30
संजय पाटील अमळनेर : केंद्र शासनाच्या इंधन व महागाई वाढीच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी काँग्रेसतर्फे पेट्रोल पंपावरून सायकल मोर्चा प्रांत ...

इंधन दरवाढ निषेधार्थ अमळनेरला काँग्रेसतर्फे सायकल मोर्चा
संजय पाटील
अमळनेर : केंद्र शासनाच्या इंधन व महागाई वाढीच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी काँग्रेसतर्फे पेट्रोल पंपावरून सायकल मोर्चा प्रांत कचेरीवर आणण्यात आला.
महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, तालुकाध्यक्ष गोकुळ पाटील, शहराध्यक्ष मनोज पाटील, किसान सेलचे बी. के. सूर्यवंशी, मुन्ना शर्मा, सईद तेली , अलीम मुजावर, युवकचे अध्यक्ष महेश पाटील, प्रवीण जैन यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यानी शिव पेट्रोल पंपावरून गॅस, डिझेल, पेट्रोल, महागाई विरोधात सायकलवर बसून मोर्चा प्रांत कचेरीवर आणला होता.
दरम्यान, जनजागृतीसाठी गावातूनदेखील त्यांनी सायकल रॅली काढली.