तिरपोळेत पाझर तलावाच्या बांधावरील २८ झाडांची कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:23 IST2021-09-16T04:23:13+5:302021-09-16T04:23:13+5:30
मेहुणबारे ता. चाळीसगाव : तालुक्यातील तिरपोळे ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या पाझर तलावाच्या बांधावरील तब्बल डेरेदार अशा २८ वृक्षांची कत्तल ...

तिरपोळेत पाझर तलावाच्या बांधावरील २८ झाडांची कत्तल
मेहुणबारे ता. चाळीसगाव : तालुक्यातील तिरपोळे ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या पाझर तलावाच्या बांधावरील तब्बल डेरेदार अशा २८ वृक्षांची कत्तल करून त्यांची विल्हेवाट लावणाऱ्या तीन जणांच्या विरुद्ध मेहूणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय धनाजी तिरमली, राहुल राजेंद्र तिरमली आणि अविनाश संजय तिरमली (सर्व रा. तिरपोळे ता. चाळीसगाव) अशी या गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असलेल्या पाझर तलावाच्या बांधावर पिंपळ, आंबा, जांभूळ, बाभूळ अशी डेरेदार २८ झाडे होती. वरील तीनही जणांनी १७ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या दरम्यान, ही झाडे कापून नेली.
याबाबत जाब विचारण्यास गेलेल्या सरपंचांनाही त्यांनी परवानगी नाही, असे सांगत धमकी दिली. सरपंच यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील तीनही संशयितांविरुद्ध मेहूणबारे पोलीस ठाण्यात सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुभाष पाटील हे करीत आहेत.