दिवसा चोरीचा प्रयत्न चोरटे सीसीटीव्हीत कैद

By Admin | Updated: October 11, 2015 23:49 IST2015-10-11T23:49:47+5:302015-10-11T23:49:47+5:30

धुळे : अभयनगरात दिवसा चोरीचा प्रयत्न करणारे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.

Custody of thieves stolen during the day | दिवसा चोरीचा प्रयत्न चोरटे सीसीटीव्हीत कैद

दिवसा चोरीचा प्रयत्न चोरटे सीसीटीव्हीत कैद

धुळे : शहरातील अभयनगरात अजय महाले यांच्या घरात रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास दोन चोरटय़ांनी प्रवेश केला. परंतु वेळीच त्यांना घरातील महिलांनी पाहिल्याने चोरटय़ांना रिकाम्या हाती पळ काढावा लागला. परंतु घरात बसविलेल्या सीसीटीव्हीमध्ये ते दोन्ही चोरटे कैद झाले आहेत.

अभयनगरात राहणारे अजय दत्तात्रय महाले यांच्या घरात रविवारी दुपारी घरात फक्त त्यांच्या प}ी होत्या. घराचा मुख्य दरवाजा बंद होता. त्यामुळे चोरटय़ांना वाटले घरात कोणीच नाही. तेव्हा चोरटय़ांनी घराच्या कुंपणाच्या भिंतीवरून उडी घेत आत प्रवेश केला आणि घराच्या मागील दरवाजाची कडी तोडण्याचा प्रय} सुरू केला. दरम्यानच्या काळात घरात असलेल्या अजय महाले यांच्या प}ीस मागील दरवाजाजवळ दोन युवक असल्याचे दिसले. तेव्हा त्यांनी जोराने आवाज दिला. त्यांचा आवाज ऐकून चोरटय़ांनी तेथून पळ काढला. मात्र घराच्या बाहेर सीसीटीव्ही बसविलेले असल्याने दोघे चोरटे त्यात कैद झाले आहेत. या आधीही महाले यांच्या घरात दोन वेळा चोरी झाली आहे. त्याची पोलिसात नोंद आहे. या घटनेसंदर्भात मात्र आझादनगर पोलीस स्टेशनला रात्रीर्पयत कुठलीही नोंद नव्हती.

Web Title: Custody of thieves stolen during the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.