सुरेशदादांच्या उमेदवारीबाबत उत्सुकता

By Admin | Updated: June 9, 2014 14:11 IST2014-06-09T14:11:46+5:302014-06-09T14:11:46+5:30

लोकसभा निवडणुकीची धामधूम आटोपताच विविध राजकीय पक्ष तसेच इच्छुकांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असून त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.

Curiosity about Sureshdad's candidature | सुरेशदादांच्या उमेदवारीबाबत उत्सुकता

सुरेशदादांच्या उमेदवारीबाबत उत्सुकता

विकास पाटील ■ जळगाव 

लोकसभा निवडणुकीची धामधूम आटोपताच विविध राजकीय पक्ष तसेच इच्छुकांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असून त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. मतदारांमध्ये आता सर्वाधिक उत्सुकता आमदार सुरेशदादा जैन यांच्या उमेदवारीबाबत आहे. ते स्वत: निवडणूक लढवितात की, कुटुंबीयांना संधी देतात, याबाबत मतदारांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
घरकूल गैरव्यवहार प्रकरणात आमदार सुरेशदादा हे दोन वर्षांपासून कारागृहात आहेत. त्यामुळे ते विधानसभा निवडणूक लढविणार की नाही, याबाबत खान्देश विकास आघाडीने स्पष्ट केलेले नाही. ते स्वत: पुन्हा एकदा मैदानात उतरतात की, कुटुंबीयांना संधी देतात? याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे. सुरेशदादा हे निवडणूक लढवणार नसतील तर खान्देश विकास आघाडीचे अध्यक्ष रमेशदादा जैन अथवा सुरेशदादा यांचे सुपुत्र राजेश जैन हेसुद्धा उमेदवार असू शकतात. मात्र याबाबत अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. दरम्यान, तीन आठवड्यांपूर्वी शिवसेनेच्या बैठकीत संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनी सुरेशदादा हेच उमेदवार असतील, असे पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. 
खासदार ईश्‍वरलाल जैन यांच्या कुटुंबीयांशीही सुरेशदादा यांची जवळीक असल्याने ते उमेदवार नसले तर माजी आमदार मनीष जैन हेसुद्धा रिंगणात उतरू शकतात. खासदार जैन यांनी राजकारणाची सुरुवात जळगाव शहरातूनच केली होती. हा धागा मनीष यांच्या उमेदवारीशी जोडला जात आहे. 
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मनोज दयाराम चौधरी हे इच्छुक आहेत. मात्र ही जागा काँग्रेसच्या ताब्यात असून ती राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यास काँग्रेसने स्पष्टपणे नकार दिला आहे. काँग्रेसकडून डॉ.ए.जी. भंगाळे यांच्या नावाची चर्चा आहे. डॉ.भंगाळे यांचे नातेवाईक असलेले भाजपाचे नगरसेवक सुरेश भोळे तसेच राष्ट्रवादीकडून विष्णू भंगाळे हेसुद्धा इच्छुक आहेत. भंगाळे कुटुंबातील किमान एकजण निवडणुकीत उतरेल, अशी चिन्हे आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराला मिळालेल्या यशामुळे पक्षाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आमदार गिरीश महाजन यांनी जागा अदलाबदलीची मागणी केली होती, त्यास सेनेने कडाडून विरोध केला आहे. मनसेतर्फे जिल्हाध्यक्ष ललित कोल्हे तयारीला लागले आहेत. निवडणुकीला चार महिन्यांचा अवकाश असताना सुरेशदादा यांना तीन विरोधक तयार झाले आहेत. आता फक्त सुरेशदादा यांच्या भूमिकेबाबत मतदारांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. 
 
सुरेशदादा जैनशिवसेना६४,७0६
मनोज दयाराम चौधरीअपक्ष३३,३0१
अँड.सलीम पटेलकाँग्रेस१७,६१२ 
लोकसभा निवडणुकीत ए.टी. पाटील यांना ८३,३८९ एवढे मताधिक्य 
इच्छुकांचे नाव पक्ष
सुरेशदादा जैन शिवसेना, खाविआ
ललित कोल्हेमनसे
मनोज चौधरी राष्ट्रवादी
सुरेश भोळे भाजपा 

Web Title: Curiosity about Sureshdad's candidature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.