अवैध धंद्यांना आळा बसवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:17 IST2021-09-18T04:17:10+5:302021-09-18T04:17:10+5:30

अवैध वाळू वाहतूक, अवैध गौण खनिज वाहतूक, खूप मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. शहरात अवैध दारू विक्रीमुळे तरुण मुले त्याच्या ...

Curb illegal trades! | अवैध धंद्यांना आळा बसवा!

अवैध धंद्यांना आळा बसवा!

अवैध वाळू वाहतूक, अवैध गौण खनिज वाहतूक, खूप मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. शहरात अवैध दारू विक्रीमुळे तरुण मुले त्याच्या आहारी जात आहेत. अनेक कुटुंबे यामुळे उद्ध्वस्त होत आहेत. बस स्थानक पाठीमागे सकाळपासून रात्री उशिरापर्यंत प्लास्टीक पिशव्यात दारू विकली जाते. पोलीस प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असते. महामार्गावर रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर खासगी वाहनांमधून लोखंड, पेट्रोल, गॅस, सिमेंट, डिझेल यांची तस्करी होत आहे. सट्टा व पत्ता मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. गुटखा उदास विक्री होत आहे. यावर त्वरित आळा घालणे, तरुणांना व्यसनापासून वाचविणे अत्यंत गरजेचे आणि महत्त्वाचे आहे.

तरी वरील बाबींवर त्वरित आळा घालण्यासाठी ठोस पाऊल उचलून दोषींवर कारवाई करून, अवैध धंदे तत्काळ बंद करण्यात यावे, अन्यथा शिवसेनेकडून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना शहरप्रमुख अशोक मराठे यांनी दिला आहे. याबाबत शिवसेनेचे अशोक मराठे, आबा महाजन, सावन शिंपी आदींनी तहसीलदार अनिल गवांदे व पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांना लेखी निवेदन दिले आहे.

छाया- पारोळा शहरात सर्रासपणे सुरू असलेले अवैध धंद्यांना आळा घालावा, यासाठी पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांना निवेदन देताना, शिवसेनेचे अशोक मराठे, आबा महाजन, सावन शिंपी आदी.

Web Title: Curb illegal trades!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.