चोपडा शहराची संस्कृती आणि समज चांगली आहे - अरुणभाई गुजराथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:20 IST2021-08-21T04:20:21+5:302021-08-21T04:20:21+5:30

चोपडा : शहराची संस्कृती व समज चांगली आहे. एकमेकांचे प्रश्न नेहमी सर्वच जण समजून घेत असतात. तसेच ...

The culture and understanding of Chopda city is good - Arunbhai Gujarathi | चोपडा शहराची संस्कृती आणि समज चांगली आहे - अरुणभाई गुजराथी

चोपडा शहराची संस्कृती आणि समज चांगली आहे - अरुणभाई गुजराथी

चोपडा : शहराची संस्कृती व समज चांगली आहे. एकमेकांचे प्रश्न नेहमी सर्वच जण समजून घेत असतात. तसेच चोपडा शहरातील बहुतांश रस्ते हे खड्डेमय झाले आहेत. नागरिकही खूप सोशिक आहेत. सहनशीलता चांगली असल्याने कोणी नागरिकाने या खड्ड्यांमध्ये झाड लावले नाही, असे प्रतिपादन विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी येथे केले.

येथील पाच कोटी रुपयांच्या रामपुरा भागात उभारलेल्या अमरधामच्या लोकार्पण सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांच्या हस्ते स्मशानभूमीचे फीत कापून उद्घाटन करून लोकार्पण करण्यात आले.

शहरात स्मशानभूमी महाराष्ट्रात एक आदर्श मॉडेल ठरेल, या पद्धतीने बांधकाम करण्यात आले आहे. स्मशानभूमीत येणारी प्रत्येक व्यक्ती नेत्रदान हा संदेश घेऊन जाणार आहे, त्यासाठी डोळ्याची प्रतिकृती आणि गरुडावर तुकाराम महाराज आरूढ झाले असल्याचा पुतळा बसवल्याने त्यातूनही चांगले विचार स्मशानभूमीमध्ये येणारे नागरिक घेऊन जातील, या पद्धतीने स्मशानभूमीचे काम करण्यात आले आहे.

व्यासपीठावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, नगराध्यक्षा मनीषा चौधरी, गटनेते जीवन चौधरी, उपनगराध्यक्ष भूपेंद्र गुजराथी, प्रांताधिकारी सीमा अहिरे, सुमित शिंदे, तहसीलदार अनिल गावित, माजी आमदार प्रा. दिलीपराव सोनवणे, चोसाका माजी चेअरमन ॲड. घनश्याम पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोरख तात्या पाटील, बांधकाम सभापती रमेश शिंदे, सेनेचे विरोधी पक्षनेते महेंद्र धनगर, शहराचे स्वच्छतादूत डॉ. विकास हरताळकर, चोसाकाचे चेअरमन अतुल ठाकरे, माजी चेअरमन नीता पाटील, पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, बाजार समितीचे सभापती दिनकरराव देशमुख, माजी सभापती जगन्नाथ पाटील, गिरीश पाटील, जिल्हा बँकेच्या माजी व्हाइस चेअरमन इंदिरा पाटील, माजी नगराध्यक्षा डॉ.जया पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती गोकुळ पाटील, कल्पना पाटील, भारती बोरसे, उपसभापती सूर्यकांत खैरनार, नगरसेवक भय्या पवार, राजाराम पाटील, कृष्णा पवार, सरला शिरसाठ, संध्या महाजन, सुरेखा महाजन, आशिषभाई गुजराथी, अमृतराज सचदेव, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंदराव रायसिंग, विजय पाटील, उद्योजक सुनील जैन, ॲड. डी.पी.पाटील, शहराध्यक्ष श्यामसिंग परदेशी, अक्रम तेली, नौमान काझी, अकील जहागीरदार आदी उपस्थित होते.

अध्यक्षपदावरून अरुणभाई गुजराथी बोलताना म्हणाले की, शहरातील प्रत्येक भागातील नगरसेवक हा पालिकेचा आत्मा असतो. पदाला महत्त्व नसते, परंतु जनता आणि नगरसेवक यांच्यामध्ये आत्मविश्वासाचे नाते तयार होते. शहराच्या विकासासाठी नगरसेवकांच्या माध्यमातून चांगले काम करता येते. चोपडा नगरपालिकेतील गटनेते जीवन चौधरी हे नेहमी शहराचा विकास करण्यासाठी धडपडत असतात. त्यांचा एक पाय जळगाव येथे, तर दुसरा पाय मुंबईमध्ये निधी मिळवण्यासाठी असतो. पैसा आणला म्हणजे प्रश्न संपले असे नसते. तर, शहरात जवळपास शंभरच्यावर कॉलनी आहेत. या सर्व भागात रस्ते आणि गटारे अजूनही करता आलेले नाहीत. ते का झाले नाही, याबाबतही नगरपालिका प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांना पाहावे लागेल.

अमरधामची निर्मिती करणारे आर्किटेक्ट नंदकिशोर भांडारकर व जितेंद्र खरोटे आणि बांधकाम करणारे ठेकेदार अनिल कदम आणि राजेंद्र पाटील यांचाही सत्कार जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. अमरधाममध्ये प्रथमच स्टेज कार्यक्रम झाल्याने लोकांमध्ये कुतूहलतेचा विषय झाला होता. म्हणून, अमरधाममध्ये स्टेज कार्यक्रम कसा? याबाबत अनेकांनी प्रश्न विचारले. परंतु, अमरधाम पाहिल्यानंतर सर्वांनी कामाची वाहवा केली.

मोहनलाल छोटालाल गुजराथी या स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार करण्यात आला.

शिक्षक राधेश्याम पाटील यांनी तर आभार गटनेते जीवन चौधरी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी मुख्याधिकारी अविनाश गांगोडे, बांधकाम अभियंता सचिन गवांदे आणि सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: The culture and understanding of Chopda city is good - Arunbhai Gujarathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.