बालाजी महाराजांच्या मस्तकी भक्ताकडून रत्नजडीत मुकुट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 11:51 PM2017-09-21T23:51:24+5:302017-09-21T23:53:36+5:30

पारोळा येथील ऐतिहासिक श्री बालाजी महाराजांच्या मस्तकी एका भक्ताने र}जडीत मुकुट गुरुवारी सवाद्य मिरवणूक काढून अर्पण केला.

The crown of jewelery by Balaji Maharaj's head worshiper | बालाजी महाराजांच्या मस्तकी भक्ताकडून रत्नजडीत मुकुट

बालाजी महाराजांच्या मस्तकी भक्ताकडून रत्नजडीत मुकुट

Next
ठळक मुद्देकाही वर्षापूर्वी मूर्तीच्या मस्तकावरील मुकुट गेला होता चोरीसभावसार नामक भक्ताने मुकुट अर्पण करण्याची इच्छा मुलांकडून करवून घेतली पूर्ण

लोकमत ऑनलाईन पारोळा, दि.21 : श्री बालाजी महाराजांच्या मस्तकी एका भक्ताने रत्नजडीत सुवर्ण मुकुट तर नगराध्यक्ष करण पाटील यांनी ‘श्रीं’ना वहन मिरवणुकीसाठी 11 पोषाख गुरूवारी अर्पण केले. काही वर्षापूर्वी बालाजी महाराजांचा रत्नजडीत मुकूट चोरीला गेला होता. त्यामुळे ‘श्रीं’च्या मस्तकी साधा मुकूट होता. शहरातील ओंकार भावसार यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ ‘श्रीं’च्या मस्तकी मुकूट अर्पण करावा असे मुलांजवळ बोलून दाखविले होते. मुलगा तुषार व अमोल यांनी चोरीला गेलेल्या मुकुटाच्या हुबेहुब रत्नजडीत मुकूट जयपूर येथून बनवून तो ‘श्रीं’च्या मस्तकी अर्पण केला. त्या अगोदर मुकुटाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. भावसार यांचे जावई प्रसाद भावसार व मुलगी निलिमा यांच्या हातात मुकूट देवून मिरवणूक काढण्यात आली. आणि विधीवत पूजा करुन हा मुकूट अर्पण करण्यात आला. दरम्यान, नगराध्यक्ष करण पाटील यांनी आजपासून ब्रrाोत्सव सुरु झाल्याने दररोज वहन मिरवणुकीतून बालाजींना परिधान करावयाचे 11 प्रकारचे पोषाख अर्पण केले. यावेळी संस्थानाचे अध्यक्ष श्रीकांत शिंपी, कार्याध्यक्ष रावसाहेब भोसले, विश्वस्त प्रकाश शिंपी, डॉ.अनिल गुजराथी, केशव क्षत्रिय, संजय कासार, डॉ.नंदू सैदानी, अरुण वाणी, पी.जी.पाटील, किरण वाणी, चंद्रकांत शिंपी, राजेंद्र चौधरी, दिलीप शिरोडकर, गुणवंत पाटील, रमेश भगवती, अभय शिंपी, प्रकाश कासार, प्रमोद शिरोळे, भटू शिंपी उपस्थित होते.

Web Title: The crown of jewelery by Balaji Maharaj's head worshiper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.