करोढ्याची भाजी आणि लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:20 IST2021-09-24T04:20:53+5:302021-09-24T04:20:53+5:30
‘कोरोना लस घेण्याआधी काहीतरी खाऊन जायलाच हवे...’ एक आजीबाई दुसऱ्या आजींना सांगत होत्या... दुसऱ्या आजीबाईंनी 'हो का' म्हणत प्रतिसाद ...

करोढ्याची भाजी आणि लस
‘कोरोना लस घेण्याआधी काहीतरी खाऊन जायलाच हवे...’ एक आजीबाई दुसऱ्या आजींना सांगत होत्या... दुसऱ्या आजीबाईंनी 'हो का' म्हणत प्रतिसाद दिला. नंतर मात्र, लस घेतल्यानंतर काहींना आलेल्या रिॲक्शनबाबत त्यांच्यात चर्चा सुरू झाली... कोणाला ताप आला, कोणाचे अंग दुखले; तर कोणाला काही...
पहिली आजी : 'बहीण त्या दिवशी आमच्या नात्यातली एक बाई करोढ्याची भाजी खाई गेलती लस घ्यायले... आली न काय नुसती पोटात दुखोये... अन मंग संडाशी लागल्या तीले... लस घ्यायले जाताना करोढ्याची भाजी नको खाई जायजो...
दुसरी आजी : व माय मिन्ह आजच करोढ्याची भाजी खाल्ली.. पण लय तिखट व्हती....पण त्या बाईले लस न झालं की तिखट भाजी खायान झालं मंग अस..
पहिली आजी : काय माहीत माय मंग... लसच आपल्याले काय माहीत... मही पहिली लस झाली... दुसरी बाकी आहे... काहीकाहीत म्हणे तिसरी लसबी भेटणारहाय.. काही महिन्यानं...
दुसरी आजी : अढी दुसरीचा पत्ता नी बारे कुढी तिसरी घेती माय... जावूदे तुले आनी दिऊ का करोढ्याची भाजी...
पहिली आजी : नको व माय झालं म्हय जेवण...
भाजी तिखट की लसीचा परिणाम? हा प्रश्न अनुत्तरितच राहिला.